आगामी निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढवणार - संभाजी कदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्चास फाटा देऊन रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप केली आहेत. शहरात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत अाहे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढून भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले. 
Loading...

वर्धापन दिनानिमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कदम बोलत होते. कार्यक्रमाला माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक संजय शेंडगे, सभागृहनेते गणेश कवडे, मनोज दुलम, सुरेश तिवारी, दत्ता मुदगल, डॉ. आशिष भंडारी, रमेश परतानी, संतोष गेनाप्पा, सचिन शिंदे, अशोक दहिफळे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. 

शवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून शिवसेनेने नेहमीच ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाला महत्त्व दिले आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक हा शिवसेनेशी जोडला गेला. केंद्रात व राज्यात शिवसेना सहभागी असली, तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सत्तेच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पावले उचलत आहे. त्यामुळेच आजचा युवक शिवसेनेकडे आकर्षित होत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न हे शिवसेने मार्गी लावले आहेत. सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात समरस होण्याचे काम शिवसैनिक करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.