गोरक्षकांना मारहाणप्रकरणी नगरसेवकांसह 62 जणांवर गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिक-पुणे महामार्गावर गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करतात म्हणून संगमनेरात तीन गोरक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली. या गोरक्षकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेवून मारहाण झाली.हा प्रकार मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संगमनेर नगरपालिकेच्या एका नगरसेवकासह सुमारे 62 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी, आशुतोष शरद भुजबळ (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी रस्ता, संगमनेर) हा गोरक्षक आहे. तो व त्यांचे दोन मित्र हे पुणे-नाशिक महामार्गाहून संगमनेरकडे येत होते. त्यावेळी तेथून जात असलेल्या एका चारचाकी वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचा संशयावरून त्यांनी वाहनचालकास विचारपूस केली. त्यावेळी चालकाने भुजबळ याला मारहाण करत सदर वाहनातून मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे नेत जबर मारहाण केली. 

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भुजबळ याने दिलेल्या फिर्यादिवरून नगरसेवक रिजवान शेख, जाकीर अन्वर कुरेशी, नवाज अन्वर कुरेशी, सुफीयान नशीर कुरेशी, अजमल लतीफ कुरेशी, लाला रजाक कुरेशी, तैसीफ आसिफ कुरेशी, हुजेफ आदीक कुरेशी, सोहेल फैरोज कुरेशी, जफर उमर कुरेशी, कासीफ असद कुरेशी, वाहिद अब्दुल करीम कुरेशी यांसह एकूण 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.