गुगल म्हणतं सलमान खान सर्वात वाईट अभिनेता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात. असं असलं तरीही त्याच्या अभिनयाबाबत बऱ्याचदा उलटसुलट प्रतिक्रिया येतात. अशातच गुगलनेही सलमानला एक धक्का दिला आहे.‘बॉलिवूडचा सर्वात वाईट अभिनेता कोण’ असं विचारताच गुगलचं उत्तर येतं, सलमान खान.
Loading...

दरम्यान,नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रेस 3’ नंतरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा करत अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.याअगोदरही गुगलवर काही धक्कादायक उत्तरे पाहायला मिळालेली आहेत. ‘फेकू’ असं सर्च केल्यानंतर गुगलवर नरेंद्र मोदी यांचं नाव समोर आले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.