नरेंद्र मोदीचं सर्व जग फिरून झालं, आता ते मंगळावर थापा मारायला जातील - उद्धव ठाकरे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंतप्रधान नरेंद्र मोदीचं थापामारत सर्व जग फिरून झालं, आता ते मंगळावर थापा मारायला जातील असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केला. आणि शिवसेनेची टीकेची धार कमी झालेली नाही हे दाखवून दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणारच आहे, त्यासाठी शिवसनिकांनी तयार राहावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.
Loading...

नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
अमित शहांनी मातोश्रीव भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या टीकेची धार बोथट होईल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. चार वर्ष फक्त थापा मारत मोदी फिरत राहिेले. सर्व जग फिरून झालं. आता मोदी फिरायला मंगळावरही जावू शकतात. तिथे जावूनही ते थापाच मारतील. जनतेच्या पैशातून जाहीरातींवर हजारो कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत.

स्बबळाचा नारा
महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ताच येणार आहे. स्वबळावर सत्ता आणून शिवसेनेचाच मुख्यमत्री राज्यात सत्तेवर येणार आहे यात शंका नाही. जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकणार नाही तोपर्यं शिवसैनिकांनी शांत राहू नये. आम्ही सत्ता आल्यावर माजणार नाही आणि हरल्यावर थांबणार नाही. कठिण परिश्रम करून राज्यात सत्ता स्थापन करणारच.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.