जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस कोरडे गेल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या अाहेत. गेल्या पंधरा दिवसांत अवघा ८.८७ टक्केच पाऊस झाला. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नगर जिल्ह्यात १ व २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस झाला. 

Loading...
त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघा ८.८७ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३२.८८ टक्के पाऊस झाला होता. खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाणही अधिक होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.