गाडीच्या काचा फोडून पावणे दोन लाखांची जबरी चोरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील हळगाव शिवारातील जामखेड आगी रोडवर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी हळगाव चौडी रोडवर चारचाकी कार अडवली आणि गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली व गाडीतील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी तीन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र उर्फ नितीन भागवत तेरकर (वय ४३, रा. आघी ता. जामखेड) हे शनिवारी जामखेड येथे मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडे ठेवलेले दीड लाख रुपये घेऊन गाडीमधून (क्रमांक एम एच ४३ आर ५७२७) जामखेडहून आघीकडे चालले होते.

Loading...
ही कार आघी गावच्या शिवारात हळगाव चौंडी रोडवर आली असता पाठीमागून मोटारसायकलवरून (क्रमांक एम एच १६ -९७३) आलेले आरोपी गुलाब दादासाहेब खरात, भाऊसाहेब दादासाहेब खरात, (दोघे रा. खरातवाडी), पिनु अजिनाथ मोरे (रा. हळगाव) हे त्या ठिकाणी आले.

यावेळी तिघांनी कार चालक व ट्रॅक्टरवर असलेला ड्रायव्हर गुफुर लाला शेख यांना गाडीच्या खाली ओढून काठीने मारहाण केली. तसेच मुलीच्या लग्नासाठी सामान खरेदी करण्यासाठी आणलेले दीड लाख रुपये रोख व फिर्यादीच्या अंगावरील दहा ग्रॅमचे सोने असा एकूण १ लाख ८४ हजार २५४ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.