श्रीरामपुरात घरफोडी,८ तोळे सोने व रोख रक्कम ७० हजार लंपास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर येथील मोरगे वस्तीवरील सूर्यपुष्प कॉम्प्लेक्समध्ये राहाणारे शैलेश नंदकिशोर कांकरीया यांचे रविवारी दुपारी राहत्या घराचे कुलुप तोडून ८ तोळे सोने व रोख रक्कम ७० हजार असा ३ लाख १० हजारांचा ऐवज घरफोडी करुन चोरट्यांनी लंपास केला आहे.

शैलेश कांकरीया हे कुटुंबासह श्रीरामपूर येथील त्यांचे मामा प्रेमचंद, विनोद व गौतम सुराणा यांच्याकडे लग्नानिमित्त कार्यक्रम असल्याने रविवार दि.१७ जून रोजी त्यांच्या घरी सकाळी ११ वाजता गेले होते. दुपारी २.३० वाजता जेवन करून नंदकिशोर कांकरीया घरी आले असता घराचे कुलुप तुटलेले दिसले.

Loading...
त्यानंतर घरात बेडरुममधील कपाटाची उचकापाचक झालेली दिसली. एका ड्रॉव्हरमधील हा ऐवज चोरीस गेला आहे. लग्नानिमित्त शैलेशने आईसाठी साडेपाच तोळ्याच्या बांगड्या नुकत्याच दोन दिवसापुर्वी केल्या होत्या. 

बांगड्या, कानातील दोन सेट व रोख रक्कम ७० हजार ड्राव्हरमध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. रात्री उशीरा तक्रार नोंदविली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.