वादळामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुळानगर भागात  वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यात पिकांसह आजूबाजू परिसरातील झाडे पडली. यातील एक झाड शहरासाठी पाणी उपसा करणाऱ्या मुख्य उच्चदाब वीज वाहिनीवर पडली. त्यामुळे पाणी उपसा यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

दुरूस्त होण्यास सायंकाळपर्यंत वेळ जाणार आहे. त्यानंतर पाणी उपसा होऊन पाणीपुरवठा सुरू होईल. या प्रक्रियेला मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा उद्या (मंगळवार) विस्कळीत राहणार आहे. 

Loading...
वादळी वाऱ्यासह पाऊस थांबल्यानंतर महापालिका आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे झाड हटविण्याचे काम करत होते. त्यासाठी मुख्य उच्चदाब वीजवाहिनीचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. 

शहराच्या मध्यवर्ती भागाला उद्या (मंगळवारी) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, वादळी वाऱ्यासह पावसाची पुढील काही महिने हजेरी असणार आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नये. पाणी बचत करून वापरावे. त्यांचे संकलन चांगले करून ठेवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.