पाथर्डीत भाजप कार्यकर्त्यांच शासनाच्या विरोधात आक्रोश आंदोलन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊसतोडणी कामगारांची फसवणूक करत शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळ गुंडाळल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढत निषेध केल. त्यासाठी पुकारण्यात आलेल्या पाथर्डी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

आंदोलकांनी बंदचे अवाहन केल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजपच्याच कार्यकर्त्याकडून सरकारच्या विरोधात आंदोलन होत असल्याने भाजपच्या इतर पदाधिकारी व नेत्यांनी मात्र पाठ फिरवली. 

Loading...
यावेळी बोलताना मुख्य संयोजक नागनाथ गर्जे म्हणाले, ऊसतोडणी कामगारांचा प्रभाव असलेल्या पाथर्डी तालुक्यात या निर्णयामुळे सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. तोडणी कामगारांचा जो अपमान केला आहे, त्याची किंमत शासनाला आगामी काळात चुकवावी लागेल. 

कामगारांची फसवणूक करण्याचे पाप शासनाने केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो ऊस तोडणी कामगारांनी भाजपला मते दिली. मतांसाठी तोडणी कामगार चालतात. विश्वास संपादन करण्यासाठी मुंडे यांना पुढे केले. त्यांच्या निधनानंतर कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम झाल्याने कामगार स्वस्थ बसणार नाहीत.

आंदोलनाचे नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा गोपीनाथ मुंडे विचार मंचाचे अध्यक्ष नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, संदीप भडके यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावरील वसंतराव नाईक पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

यामध्ये आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, मनसेचे अविनाश पालवे व संतोष जिरेसाळ, विजय भगत, हरी पालवे, अक्षय पाखरे, विजय शिरसाठ, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे, अभय गांधी, जालिंदर काटे, पंकज मुनोत, अनंत कराड, युसूफ शेख, संदीप गर्जे, नितीन उरणकर, बाबू मर्दाने, भास्कर पोटे सहभागी झाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.