कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण जगताप यांनी कर्ज़बाज़ारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार,दि. १७ जून रोज़ी दुपारच्या सुमारास घडली. 

Loading...
चिचोंडी पाटील येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण जगताप (वय ६२) यांच्याकडे पतसंस्था व विविध विकास सेवा सोसायटीचे कर्ज होते. सततची नापिकी व शेतमालाला भाव नसल्यामुळे ते कर्ज़ फेडू शकत नव्हते. यामुळे त्यांनी दि.१७ जून रोजी दुपारच्या सुमारास नांदूर रस्त्यालगत एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली ज़ीवनयात्रा संपवली,त्यांच्यामागे दोन मुले व पत्नी, असा परिवार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.