आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना सोमवारी राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. 

Loading...
त्यामुळे बांदेकर यांना दरमहा साडेसात हजार रुपयांचे मानधन, समितीच्या प्रत्येक बैठकीस ५०० रुपये, दूरध्वनीवरील खर्च म्हणून दरमहा तीन हजार रुपयांची प्रतिपूर्ती, वाहन, वाहन चालक व इंधनापोटी दरवर्षी ७२ हजार रुपये मिळतील तसेच कार्यालयीन कर्मचारी नेमता येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.