नगर शहरात भरदिवसा घरफोडी 4 लाखांचे दागिने लुटले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उपनगरातील तपोवन रोडवरील निर्मलनगर येथे अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेत 4 लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. 

Loading...
या घटनेची अधिक माहिती अशी, फिर्यादी संभाजी जयवंत आव्हाड (रा. साईसमर्थ रेसिडेन्सी, निर्मलनगर, तपोवन रोड, अ. नगर) हे व त्यांची पत्नी मंदा संभाजी आव्हाड दोघेजण केडगाव येथे त्यांच्या सुनेला भेटण्यासाठी गेले असताना तसेच मुलगा किशोर हा आर्मी कॅन्टींगला गेला असताना दि. 16 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकाटून कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील लाकडी कपाटाच्या आत ठेवलेले 4 लाख 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.