लोकवर्गणीतून बुझविण्यात आले गंगा उद्यान चौक रस्त्यावरील धोकादायक खड्डे!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.11 मधील गंगा उद्यान चौक येथे रस्त्यावरील धोकादायक खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून या रस्त्याची दुरुस्ती करुन, खड्डे बुझविण्यात आले.

गंगा उद्यान चौक येथे रस्त्यावर अनेक दिवसापासून मोठे खड्डे असल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत होते. अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना या खड्डेमय रस्त्यामुळे दुखापत झाली. पाऊसाळा सुरु झाल्याने अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महापालिकेकडे अनेक वेळा तक्रार अर्ज करण्यात आले. 

Loading...
मात्र महापालिका व स्थानिक नगरसेवकाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, अजिंक्य युवा प्रतिष्ठानने पुढाकार घेत लोकवर्गणी करुन या रस्त्याची दुरुस्ती जेसीबीद्वारे केली. 

यावेळी मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर, पुनीत दुग्गल, विकी लहारे, सचिन दारकुंडे, ऋषीकेश सोले, प्रयास कांबळे, शुभम भिसे, मंगेश काकडे, आर्येश जाधव, शुभम ससाणे, सौरभ वायकर आदिंसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

प्रभागातील नागरी समस्या सोडविणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. मात्र नगरसेवक राजकारणात गुंतल्याने नागरिक माजी नगरसेवकांकडेच समस्या घेवून येत आहे. 

आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या शहराच्या विकासात्मक कार्याला कटिबध्द राहून, लोकवर्गणी करुन रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यात आल्याचे मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.