उत्तर प्रदेशात भाजप आमदारावर ४ बाईकस्वारांचा गोळीबार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पार्टी (भाजप) चे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. नंदकिशोर गुर्जर हे गाझियाबादमधील लोनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत.रविवारी रात्री बाईकस्वारांनी गुर्जर यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला.


Loading...
यावेळी गुर्जर यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर देत त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत सुरक्षित पोहचवत त्यांचे प्राण वाचवले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर रविवारी रात्री मवाना येथे झालेल्या आरएसएसच्या बैठकीत सहभागी होऊन परतत होते.

त्याचवेळी बाईकस्वारांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.गोळीबार होत असल्याचं कळताच मी खाली वाकलो आणि माझे प्राण वाचवले अशी माहिती स्वत: भाजप आमदार गुर्जर यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.