शिर्डीत बसमध्ये महिलेचा विनयभंग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंगळुरू-शिर्डी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला शेजारी बसमधे प्रवास करणाऱ्या इसमाने तीची छेडछाड करुन विनयभंग केला. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
जेनगर बंगळुरू येथील ४५ वर्षीय महिला शिर्डीला येत होती. ती कर्नाटक परिवहन मंडळाच्या बंगळुरू ते शिर्डी ऐरावत बस. केए ३७, एफ १८२२ या बस मधे १४ जून रोजी बंगळुरू येथून प्रवासास सुरवात केली असता काही वेळाने तिच्या शेजारचा बसलेला प्रवासी मंजुनाथ स्वामी याने तिचा विनयभंग केला. ही घटना पहाटे ३ वाजेदरम्यान पारेगाव (ता. खंडाळा सातारा) येथे घडली. यावरून तरुणीने स्वामी याचे विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.