कोण भरवतं उदयनराजे भोसलेंच्या मनात धडकी?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसलेंनी मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरतो असं सांगितलं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानं अनेकांना कोड्यात टाकलंय. सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय की राजेंच्या मनात धडकी भरवणारी ही व्यक्ती कोण आहे?

डॅशिंग अशा खासदार उदयनराजेंना अभिजित बिचकुलेंची भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजवर भल्याभल्यांना दिलेलं आव्हान. लोकशाहीतली अशी कोणतीच निवडणूक नाही जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नाही. नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. प्रसंगी मोदींनाही साकडं घातलं.
Loading...


बिचकुलेंना कुठल्या निवडणुकीत यश आलं नाही हा भाग वेगळा. पण त्यांचे प्रयत्न थांबले नाहीत. आता तर त्यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आणि 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार या त्यांच्या निर्धारपोस्टनं अनेकांच्या पोटात गोळा आणला असणार. बिचकुले फक्त निवडणुकाच लढवत नाहीत. तर कवी मनाच्या अभिजित यांनी गायनातही हात मारून पाहिलाय. स्वत:वरच्या त्यांच्या भन्नाट अल्बमने साताऱ्यात धुमाकूळ घातला होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.