राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर वाहनचालकांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे गावच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या एका रसवंती सेंटरजवळ रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांच्या ड्रायव्हरमध्ये तुफान सिनेस्टाईल हाणामाऱ्या झाल्या असून सुमारे दोन तास रस्त्यावर चक्का जाम झाला होता. 

शिर्डीचे साईबाबा व शिंगणापूरचे शनिदेव या जागतिक दर्जाच्या दोन देवस्थानांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून त्यात अरुंद रस्ता साईडपट्ट्या उखडलेल्या असल्यामुळे वहातूकीस मोठा अडथळा होत आहे.

Loading...
तसेच शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांमुळे वाहतूकीमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होवून बऱ्याच जणांचा मृत्यू होतो. आज घडलेली घटना दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर हे एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या कारणातून घडल्याची चर्चा होती.

दरम्यान ट्राफिक दोन्ही बाजुने जॅम झाल्याने उपस्थित ग्रामस्थांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिल्याने त्यांनी तात्काळ वांबोरी पोलीस स्टेशनचे दिलीप तुपे, एस.सरोदे, चव्हाण, बनसोडे यांना घटनास्थळी पाठविले. तोपर्यंत दोन्ही ड्रायव्हरसह थोपलेली ट्रॅफिक मोकळी झाली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.