श्रीगोंद्यात उपसरपंचाच्या जुगार अड्ड्यावर छापा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा पोलिसांनी रविवार दि.१८ रोजी तालुक्यातील पेडगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत २५००० रुपयांच्या मुद्देमालासह, जुगार खेळणाऱ्या अठराजणांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना गुप्तबातमीदारामार्फत तालुक्यातील पेडगाव गावात शंभूराजे हेल्थ क्लबच्या बाजूला असलेल्या काटवनात काहीजन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती दिली.

Loading...
त्यानुसार पोलीस पथकाने पेडगाव येथे दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.  अचानक पोलिसांना पाहून हातातील पते खाली टाकून पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी जागीच पकडून त्यांच्याकडून २५,०१० रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करून, अठरा जणांना ताब्यात घेतले.

अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदरचा जुगार अड्डा पेडगावचा उपसरपंच देविदास गणपत शिर्के याचा असल्याचे सांगितले. जुगार खेळणारे गणपत तुकाराम शिर्के, बलभीम त्रिंबक खेडकर, योगेश बापू शेळके, अशोक रंगनाथ झिटे, साहेबराव बबन गावडे, प्रकाश सुभाष खळदकर, ज्ञानदेव त्रिंबक खेडकर, नवनाथ नारायण मूळे, बशीर रहेमान तांडेल, दिलीप नामु दिवटे, भाऊसाहेब नाना खेडकर, पोपट दत्तू झिटे, रतन सीताराम झेंडे, मच्छिंद्र किसन गोधडे, उमर अब्दुल तांडेल, संदीप गुलाबराव काळे, किसन धोंडिबा गोधडे, बबन नामदेव दिवटे सर्वजण रा. पेडगाव यांना ताब्यात घेतले आहे.

तर जुगारअड्डा मालक देविदास गणपत शिर्के हा फरार आहे. पो. कॉ उत्तम संभाजी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाजुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.