पारनेरमधील वनकुटे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आदिवासींना 1 हजार दाखल्याचे वाटप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील वनकुटे गावातील जातीच्या दाखल्यापासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना आज गुरूवारी (दि.14) 1 हजार दाखल्याचे वाटप करण्यात आले. वनकुटे ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकारातून स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासींना जातीचे दाखले मिळाल्याने गावचे सरपंच राहुल झावरेंसह पदाधिकार्‍यांचे आदिवासी बांधवांनी आभार मानले. 

Loading...
पारनेर व राहुरीच्या सीमेजवळ असलेल्या दुर्गम वनकुटे गावात व परिसरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. भिल्ल, ठाकर, धनगर, ओबीसी समाजातील आदिवासी बांधवांकडे गेली 70 वर्षांपासून जातीचे दाखले नव्हते. जातीच्या दाखला काढण्यासाठी वनकुटे ते पारनेर असा 100 कि.मीचा प्रवास करूनही जातीचा दाखला मिळेलच याची शाश्‍वती नव्हती. या दाखल्यांसाठी वारंवार पारनेरला जाऊन वेळ व पैसा जात असल्याने अनेक आदिवासी बांधव व त्यांची मुले शिक्षणापासूनही वंचित राहण्याचा धोका निर्माण होत असे.

आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बाबाजी गागरे, ग्रामसेवक बी.एम. थोरात, अर्जुन कुलकर्णी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी जातीच्या दाखले वाटपाचा कॅम्प गावात भरविण्याचा निर्णय घेतला. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून आदिवासी, भिल्ल,ठाकर, धनगर,ओबीसी,चर्मकार या आदीवासी समाजातील बांधवांना 1 हजार दाखल्याचे वितरण ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले.

पोपट मेंगाल, बाळासो बर्डे, पुनजी बर्डे, रामा साळवे, बाळासाहेब खामकर, पवन खामकर, भागा काळे, अशोक काळनेर, बाळू पोकळे आदींसह हजार आदिवासी बांधवांच्या हातात जातीचे दाखले पडताच आनंद व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक खामकर, गणपत काळनेर, बाबासो पिंपळे, ताराबाई मुसळे, वर्षा करण बर्डे, इंदूबाई साळवे, सुनीता वाबळे, सुमन बर्डे, ताराबाई काळे, भीमराज गंगाड, रंजनाबाई औटी हे उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.