श्रीगोंदा पोलिसांकडून ५५ हजारांची दारु जप्त

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या सूचनेनुसार शनिवार दि.१६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल आरकेवर पोलिसांनी छापा टाकून विदेशी बनावटीची ५४ हजार ३३५ रुपये किमतीची दारू जप्त केली आह. 


याबाबत माहिती अशी की, आज रमजान ईद असल्यामुळे ड्राय डे होता. तरीदेखील काष्टी रस्त्यावरील हॉटेल आरकेवर दारू विक्री सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळाली. त्यामुळे पोवार यांनी तातडीने पोलिसांना सदर हॉटेलवर छापा टाकण्यास सांगितले.

Loading...
त्यानुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पो.ना बबन तमनर, पो. कॉ दहिफळे, ज्ञानेशवर पठारे, संतोष कोपनर, भारत खारतोडे, संजय कोतकर, अमोल आजबे, अविनाश ढेरे, रवी जाधव या पोलीस पथकाने हॉटेल आरकेवर छापा टाकत विदेशी बनावटीची ५४ हजार ३३५रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे. तर हॉटेलमधील पांडुरंग हिरामण पवार यास ताब्यात घेतले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.