लग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध,गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विवाहितेला लग्नाचे अामिष दाखवून दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
पीडित महिला शेवगाव येथे भाडे तत्त्वावर राहत होती. २०१५ पासून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना वडुले बुद्रूक येथे गणेश शेषराव दहिफळे याच्यासोबत ओळख झाली. पतीपासून मला एक मुलगा आहे, अशी कल्पना या महिलेने गणेशला दिली होती. गणेश याने वारंवार लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले.

त्यानंतर गणेशचा फोन बंद होता. म्हणून तो काम करत असलेल्या ठिकाणी ही महिला गेली असता गणेश दहिफळे यांनी मला शिवीगाळ केली व तुझा माझा संबंध नाही. माझे लग्न झाले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शेवगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.