संगमनेर तालुक्यात टोलनाक्याला ट्रकची धडक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील बंद टोलनाक्याला शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रकने जोराची धडक दिली. संगमनेर-लोणी रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. झालेल्या अपघातात टोलक्याच्या शेडचे व ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. 

Loading...

संगमनेर - लोणी रस्त्याने मालवाहू ट्रक (क्र. एमएच १७ के ५०९४) संगमनेरला मका घेवून गेला होता. संगमनेर येथे ट्रकमधील मका खाली करण्यात आली. ड्रायव्हर ट्रक घेवून श्रीरामपूरच्या दिशेने परतीचा प्रवास करीत होता. रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान वडगावपान शिवारातील बंद असलेल्या टोलनाक्याला सदर ट्रकने मधोमध धडक दिली. झालेल्या अपघातात टोलनाक्याचे शेड खाली कोसळले.

टोलनाक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. अपघातात मालवाहू ट्रकच्या दर्शनी भागाचे देखील नुकसान झाले. ट्रक ड्रायव्हरचे नाव मात्र समजू शकले नाही. अपघातास कारणीभूत ड्रायव्हर घटनेनंतर पसार झाला. शनिवारी सायंकाळपयंर्त या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.