राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत,छगन भुजबळ साई चरणी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि जनता सुखी होवो, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Loading...
भुजबळ काल पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह पत्नी, सुना व नातवंडे यांच्यासह संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास साईसमाधीचे दर्शन घेतले.साईबाबांची पाद्यपुजा करून ते साईमंदिराच्या बाहेर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. साईसमाधीच्या दर्शनानंतर त्यांनी द्वारकामाईत जाऊन दर्शन घेतले,. द्वारकामाईतल्या दर्शनानंतर त्यांनी पाच मिनिटे बसून साईंचे ध्यान केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.