चांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल ; हवामान विभाग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुढील आठवडाभर महाराष्ट्र कोरडाच राहणार आहे,  चांगल्या पावसासाठी महाराष्ट्राला अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या आठवड्यातही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. 

Loading...
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मान्सून वेळेत दाखल झाला तरी त्याचा जोर आठवडाभरही टिकला नाही.

आता महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सामान्यत: 15 जूनपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला असतो. परंतु 11 जून पासून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.