राज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारमधल्या मंत्र्यानेच कटकारस्थान रचत मला बदनाम केलं असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. अंजली दमानिया यांच्याशी संगनमत करून माझ्याविरूद्ध बदनामीची मोहिम राबवण्याचा कट रचण्यात आला होता.

त्याविरूद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत निवेदन दिलं असल्याचंही खडसे यांनी सांगितलं.राजधानी नवी दिल्लीत आलेल्या खडसे यांनी न्यूज18 लोकमत या वृत्त वाहिनीशी बोलताना हे गंभीर आरोप केलेत.
Loading...

कुठे शिजला कट?
दोन वर्षांपूर्वी अजंली दमानिया यांच्या घरी झालेल्या बैठकीत बदनामिचा कट रचला होता असं सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी जाहीर केलं होतं. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडायचं असा तो कट होता आणि त्याच प्रमाणे सर्व घडत गेलं. त्यामुळं माझा त्याच्यावर विश्वास बसला असं खडसे म्हणाले.

ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव
राज्यातल्या ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असून ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे या सर्व ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं गेलं. हा ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव आहे. आम्हीच सत्तेत राहिलो नाही तर ओबीसींचे प्रश्न मांडणार कोण असा सवालही त्यांनी केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.