विकासाची प्रक्रीया निरंतर सुरुच राहणार - ना.राधाकृष्‍ण विखे पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  खासदार साहेबांनी केलेल्‍या वैचारिक संघषार्मुळे प्रवरा परिसर उभा राहीला. त्‍यांच्‍या विकासाच्‍या विचाराला समृध्‍द करतानाच भुमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्‍यातील सामाजिक परिवर्तनाच्‍या संघर्षास कटीबध्‍द व्‍हावे लागेल. 

येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आव्‍हानं मोठी असली तरी विकासाच्‍या प्रक्रीयेत आपण कुठेही मागे राहणार नाही, असा विश्‍वास व्‍यक्‍त करतानाच या विकासाच्‍या कामाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्‍थानं संघटीतपणे हाणून पाडावी लागतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

Loading...
विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या ५९ व्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन प्रवरा परिवाराच्‍या वतीने डॉ.धनंजयराव गाडगिळ सभागृहात अभिष्‍टचिंन सोह‍ळ्याचे आयोजन करण्‍यात आले होते.

या कार्यक्रमास माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, जिल्‍हा कॉँग्रेसचे अध्‍यक्ष आण्‍णासाहेब शेलार, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, श्रीरामपुरच्‍या नगराध्‍यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्‍यक्ष करण ससाणे, नवी मुंबईचे उपमहापौर म्‍हात्रे, आदी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रवरा परिवाराच्‍या वतीने ना.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला, ना.विखे पाटील म्‍हणाले की, २०१४ साली शिर्डी मतदार संघातील मतदारांनी दिलेल्‍या प्रचंड मताधिक्‍यामुळे विरोधी पक्षनेता म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली. या सर्व कार्यकाळात काम करताना शरमेने मान खाली जाईल असे कोणतेही चुकीचे काम आपल्‍या हातून घडलेले नाही.

मतदार संघातील सामान्‍य माणसाला अभिमान वाटेल असेच काम आपण करत आहोत. खासदार साहेबांनी जो विचारांचा वारसा दिला, त्‍यालाच आपण प्ररेणा माणून काम करीत राहीलो. या कामाला आपल्‍या सर्वांचे पाठबळ मिळाले. म्‍हणूनच आज तिसऱ्या पिढीतही सर्वांचे प्रेम व्‍यक्‍त होत असलेले प्रेम पाहून एक प्रकारचा दृढ विश्‍वास निर्माण होत आहे.

विकासाच्‍या कामाची सुरुवात विचारांची बांधिलकी मानून खासदार साहेबांनी सुरु केली. विकासाचे बिजारोपन त्‍यांनी केले. आज प्रवरा शिक्षण संकुलातून ९४ हजार विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले. हेच विद्यार्थी आता जगात विविध ठिकाणी काम करताना प्रवरेचा अभिमानाने उल्‍लेख करतात.

त्‍यावेळी खऱ्या अर्थाने खासदार साहेबांच्‍या कार्याची ताकद कळते. हेच काम आता भविष्‍यातही व्‍यापकतेने पुढे न्‍यावे लागेल. भविष्‍यात बाहेरील देशांशी शैक्षणिक करार आणि रोजगारांच्‍या संधीबाबत प्रवरा शैक्षणिक संकुलातून कालबध्‍द कार्यक्रम सुरु करण्‍याचे सुतोवाचही त्‍यांनी केले.

प्रश्‍नांवर आधारीत संघर्षाला आपल्‍याला नेहमीच सामोरे जावे लागले. संघर्ष तो शेतकऱ्यांचा असो की पाण्‍याचा खासदार साहेबांनी एक भुमिका घेवून दिलेला लढा हा राज्‍याला नवी दिशा देणारा ठरला. राज्‍यातील समाज घटकांना न्‍याय देताना मतदार संघातील विकासात मात्र कुठेही कमी पडलेलो नाही. लोककल्‍याणकारी योजनांच्‍या पाठपुराव्‍यात आपला मतदार संघ राज्‍यात अव्‍वल आहे.

विकासाच्‍या या प्रक्रीयेला जाणीवपुर्वक गालबोट लावण्‍याचे कारस्‍थाने सुरु झाली आहेत. या पाठीमागे कोणत्‍या शक्‍ती आहेत हे तुम्‍हालाही माहिती आहे. पण याचा विचार न करता ही विकासाची प्रक्रीया निरंतर सुरुच राहणार असल्‍याचा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.