भरधाव टॅक्ट्ररच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भरधाव टॅक्ट्ररने जोराची धडक दिल्याने घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण महादेव घुमरे (रा. संकल्प कॉलनी, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Loading...
बुधवारी (१३ जून) रोजी साक्षी योगेश घूमरे (वय ५) ही घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. आरोपी दिपक मारूती साबळे याने त्याच्या ताब्यातील टॅक्ट्रर भरधाव वेगाने चालवून साक्षी हिस जोराची धडक दिली. या धडकेने साक्षी गंभीर जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.