श्रीगोंद्यात बँक कर्मचाऱ्यास मारहाण करून खंडणीची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत असणारे प्रतीक दामोधर गजभिये. यांना गुरूवार दि.१४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण करत, दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. 

याबाबत गजभिये यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोरख पांडुरंग लोखंडे याच्याविराधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मूळचे यवतमाळ येथील रहिवाशी असणारे प्रतीक दामोधर गजभीये हे श्रीगोंदा शहरातील या राष्ट्रीय बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करत आहेत.

Loading...
ते गुरूवार दि.१४ जून रोजी सायंकाळी १०च्या सुमारास हिरोहोंडा गाडीवरुन घरी जात असताना, मुंजोबा चौकात गोरख पांडुरंग लोखंडे रा.मुंजोबा चौक, श्रीगोंदा यांनी मोटारसायकल अडवून शिवीगाळ करत, तू बँकेत कामाला आहे. आणि तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत, आणि तुला बँकेत नोकरी करायची असेल आणि तुला येथे राहायचे असेल. तर मला तुला १० हजार रुपये द्यावे लागतील.

त्यावर बँक कर्मचारी प्रतीक दामोदर गजभीये यांनी पैसे येण्यास नकार दिल्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी बँक कर्मचारी प्रतीक दामोदर गजभीये यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने घरमालक त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी त्यांचा वाद सोडवला.

त्यावेळी तेथून जाताना तू येथे कसा राहतो आणि इथे कशी नोकरी करतो. तुला जीवे मारून टाक ण्याची धमकी दिली. त्याच्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपस पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवणनाथ दहिफळे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.