स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जिल्ह्यात विकासकामे करताना सरकारने कधीच दुजाभाव केला नाही. जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू दिली नाही. पण जो निधी दिला त्याचा साधा उपयोग सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना करता आला नाही. या सारखे दुर्दैव नाही. 

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, कधी प्रशासनावर तर कधी विरोधकांवर आरोप करण्याचा नवा फंडाच सुरु केला की काय, असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी लावला आहे. 

Loading...
या संदर्भात बेरड म्हणाले, विकास कामांना कधीच निधी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी कमी पडू दिला नाही. कॉग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेत आल्यानंतर विकास कामांनाच ब्रेक लागला. कालच्या सभेत तर जिल्हा परिषद ही ठेकेदारांसाठीची संस्था आहे. हा घणाघाती आरोप त्यांच्याच सहकारी पक्षाने करुन वाभाडे काढले.

प्राथमिक शाळा निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेकडून पुनर्विनियोजनाचे लघु पाटबंधारे २५ लक्ष, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २५ लक्ष, रस्ते २५ लक्ष असे एकूण ७५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली. याच बरोबर विशेष सवलतीचे ८ लक्ष व गणवेश व लेखनाचे ३१ लक्ष असे एकूण ३९. ५४ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती.

त्यामुळे एकूणच जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ४२५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद बैठकी मंजुर करण्यात आली. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत २५० लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली. त्यामुळे अंतिम तरतुद ७१४.५४ लक्ष करुन वाढीव तरतुद ३६४. ५४ लाख रुपयांची करुनही निधी मिळाला नसल्याच्या वल्गना करर्णा­यांना ही आकडेवारी पुरेशी आहे.

जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत विशेष निधीची तरतुद करुनही गेल्या ६महिन्यापासून हे काम कोणामुळे थांबले याचा खुलासा करण्या ऐवजी पालकमंत्र्यांवरआरोप केले म्हणजे विषय संपतो, अशीच जणु जिल्हा परिषदेची धारणा बनत चालली आहे.

जिल्हा परिषदेला विकास निधी मिळत नाही म्हणून तेव्हाही आंदोलनाचा इशारा दिला व पालकमंत्र्यांवर तेव्हाही आरोप करुन आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी बहुदा काळाची पावले ओळखून पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेवुन आपण विषय मार्गी लावू असे सांगितल्यावरच तात्काळ पालकमंत्र्यांनी बैठक घेतली व निधी उपलब्ध केला.

ही वस्तुस्थिती लपवुन राहिली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष बेरड यांनी केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.