जामखेड मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीच्या विद्यर्थिनीची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता १० वीत गेलेली विद्यार्थिनी रेणुका राम काकडे, हीने आपल्या घरातच शाळेच्या नवीन ड्रेसच्या ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत केले जात असताना ही दुर्दैवी घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Loading...

या बाबत अधिक माहिती अशी, रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिराजवळ, जामखेड) या इयत्ता नववीमधून दहावीत प्रवेश घेतलेल्या शालेय विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.१५ जून) म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत रेणुका ही इयत्ता नववी असताना कळंब (जि. उस्मानाबाद) येथे आपल्या मामाच्या गावाला शिकत होती. 


मात्र इयत्ता दहावीला ती पुन्हा आपल्या जामखेड येथे आई वडीलांकडे पुढील शिक्षणासाठी आली होती. अद्याप शाळेचा दाखला हा कळंब येथील शाळेतच होता. दि.१ जून पासून ती जामखेड शहरातील कन्या विद्यालयात दहावीच्या नियमित ज्यादा तासाला देखील जात होती. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.