आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ,प्रा. राम शिंदे यांची ग्वाही


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बारामती ते चौंडी दरम्यान झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची ग्वाही जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली, इंदापूर येथील पांडुरंग मारकड मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते. 

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, आमदार नारायण पाटील, आमदार रामहरी रूपनवर, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग मारकड, महेंद्र रेडके, दत्ताभाऊ पांढरे, भारत मारकड, श्रीकांत पाटील, विलास वाघमोडे, पंचायत समितीचे सदस्य महेंद्र रेडके, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी थोरात, पोपट पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन आरडे आदी उपस्थित होेते.


Loading...
प्रा. शिंदे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकशाही मार्गाने सनदशीर लढा दिला पाहिजे, परंतु चौंडी येथे घडलेला प्रकार योग्य नव्हता. धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.