पोलिस अधिक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी सचिन जगतापसह ६ जणांना अटक व जामीन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिस अधिक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादीचे माजी जि.प सदस्य सचिन जगताप, नगरसेवक विपूल शेटीया, अंकुश चत्तर, विक्रम शिंदे, विशाल सुर्यवंशी व भूपेंद्र परदेशी हे शुक्रवारी (दि. १५) स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले. 

त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर जामीनासाठी अर्ज दाखल केला असता प्रत्येकी २५ हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Loading...
केडगाव पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी सेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. दरम्यान सायंकाळी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना चौकशीकामी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले. 

यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात जाऊन तेथे घोषणाबाजी करून तोडफोड केली आणि आ. जगताप यांना घेऊन काळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस 
ठाण्यात सुमारे ३०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी जि.प सदस्य सचिन जगताप, नगरसेवक विपूल शेटीया, अंकुश चत्तर, विक्रम शिंदे, विशाल सुर्यवंशी व भूपेंद्र परदेशी हे शुक्रवारी (दि. १५) स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून सहा जणांना न्यायालयीन कोठडी दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.