पाथर्डीतील जावयाने कौटुंबिक वादातून सासऱ्याला ट्रकखाली चिरडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कौटुंबिक कलहामुळे संतापलेल्या जावयाने सासुरवाडीवर थेट ट्रक घातल्याचा प्रकार आष्टी तालुक्यातील मराठवाडीत बुधवारी रात्री घडला. ट्रक मिनी टेम्पोवर आदळला. त्याखाली चिरडून अंगणात झोपलेल्या सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अंभोरा पोलिसांनी जावयाला ताब्यात घेतले आहे.विठ्ठल चंद्रभान मराठे (५५) यांच्या मुलीचा विवाह पाथर्डीतील दगडवाडी येथे राहणारे अशोक रावसाहेब शिंदे (अहमदनगर) यांच्याशी झाला होता. आठवडाभरापूर्वी शिंदे दाम्पत्यात वाद झाला होता. 

Loading...
त्यामुळे अशोकची पत्नी माहेरी आली होती. यामुळे अशोक आणखीनच संतापला होता. अहमदनगरहून बुधवारी रात्री ११ वाजता तो सिमेंट घेऊन ट्रकने आष्टीकडे येत होता. त्याने अचानक ट्रक मराठवाडीकडे वळवला. सासुरवाडी येताच ट्रक थांबवण्याऐवजी त्याने वेग वाढवून घरावर ट्रक धडकवण्याचे ठरवले. घराचे कंपाऊंड तोडून ट्रक आत घुसला. 

अंगणात उभ्या असलेल्या मिनी टेम्पोवर ट्रक आदळला. त्याखाली अंगणात झोपलेले विठ्ठल सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मराठे कुटुंबीयांनी आरडाओरड केली. अशोकने सासुरवाडीहून पोबारा केला. या घटनेनंतर अंभोरा पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतले असून उशिरापर्यंर्ंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.