राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजार पळवले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दीड लाखाचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोकड पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. चिंचोली येथे बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्रीत अनेक ठिकाणांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या. 


Loading...
चोरीच्या घटनेनंतर पळून जात असताना ३० हजारांचा नेकलेस चोरट्यांच्या हातातून रस्त्यातच पडला. चिंचोली येथील डाॅ. अनिल लोखंडे यांच्या दवाखान्याबाहेर असलेला सीसीटिव्ही फोडून संरक्षक भिंतीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कटावणीच्या साह्याने दवाखान्याच्या शटरचे कुलूप तोडत असताना डाॅ. लोखंडे यांना जाग आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.