शेतकरी कर्जमाफी अर्जाचा अाज अखेरचा दिवस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३८. ५२ लाख खातेधारकांच्या बँक खात्यांत १४ हजार ९८३ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची व ऑनलाइन अर्ज करण्याची १५ जून ही अंतिम तारीख अाहे. 

Loading...
कर्जमाफी योजनेसंदर्भात गुरुवारी झालेल्या अाढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या, परंतु २००८ आणि २००९ च्या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला हाेता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.