पिंपरी-चिंचवडमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात चिमुकलीवर बलात्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आठ वर्षांच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन एका नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खराळवाडी येथील भागवत गीता मंदिरात घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी नराधमाला अटक केली. 

दरम्यान, या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली. रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.

Loading...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिरात खेळण्यासाठी गेली. त्या वेळी रोहन त्या ठिकाणी आला. तिला खेळण्याच्या बहाण्याने मंदिराच्या मागील बाजूस गाभाऱ्यात घेऊन गेला.

त्यानंतर त्याने तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आईला सांगितला असता आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी तपास करत रविवारी नराधमाला अटक केली.

त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. १८) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे पुढील तपास करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.