पाण्याच्या वादातून पती - पत्नीस बेदम मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमच्या घरासमोर पाण्याचा टॅंकर का आणत नाही व आम्हाला पाणी का देत नाही? अशी विचारणा केली असता चौघा जणांनी पती-पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील मदडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चौघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावसाहेब गव्हाणे (वय ५८, रा. मदडगाव, ता.नगर) यांच्या पत्नी पद्मावती गव्हाणे यांनी गणेश रमेश शेदाळे यास तु पाण्याचा टॅंकर आमच्या घरासमोर का आणत नाही व आम्हाला पाणी का देत नाही? अशी विचारणा केली. 

Loading...
गणेश शेदाळेसह रमेश तुकाराम शेदाळे, संभाजी तुकाराम शेदाळे व तारा संभाजी शेदाळे (सर्व रा. मदडगाव) यांनी संगणमताने पद्मावती गव्हाणे यांना हातावर, तोंडावर व पाठीवर मारहाण करत रावसाहेब गव्हाणे यांना दगड डोक्यात मारुन दुखापत केली. 

या झटापटीत रावसाहेब यांच्या खिशातील मोबाईल व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याप्रकरणी चौघा जणांविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. सोनवणे हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.