महिलेची फेसबुकवर बदनामी करणार्या आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिलेची फेसबुकवर बनावट अकाऊन्ट तयार करून सदर महिलेच्या परिवारातील सदस्यांना व इतर व्यक्तींना अश्लील मेसेज पाठवून महिलेची बदनामी करणाऱ्या गणेश नामदेव बांगर (वय २० रा. खरवंडी ता. पाथर्डी) या तरुणास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-कल्याण रोडवरील परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे गणेश बांगर याने फेसबुकवर बनावट अकौंट तयार केले. त्याद्वारे त्याने महिलेच्या मैत्रिणींना तसेच इतर व्यक्तींना त्या अकौंटवरून अश्लील मेसेज पाठविले. 

Loading...
ही बाब कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर त्यानुसार तिच्या नातेवाईकांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तातडीने या गंभीर बाबीचा तपास करत गणेश बांगर याला शोधून काढले. 

ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकातील स.पो.नि. प्रतिक कोळी, वाव्हळ, राहुल गुंडू, प्रशांत राठोड, अरुण सांगळे, भगवान कोंडार, आकाश भैरत, नेहा तावरे, उर्मिला चेके यांनी केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.