विनायक दुधाडे भैय्यूजी महाराजांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलतील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावरील उल्लेखानुसार त्यांच्या पश्चात कुटुंबाचे आर्थिक व्यवहार व आश्रमांचे व्यवहार विनायक दुधाडे या पारनेरच्या त्यांच्या शिष्याने पाहावे, असा उल्लेख करण्यात आला आहे. विनायक दुधाडे हे पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील आहे. 

विनायकचे आजोबा भिकाजी गणपत दुधाडे हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर इंदोर येथील मालवा मिलमध्ये कामाला होते. त्यांना काशिनाथ दुधाडे, गोरख दुधाडे व विष्णू दुधाडे ही तीन मुले आहेत. दुधाडे कुटुंबीय राहत असलेल्या नंदानगर भागात बहुसंख्य लोकवस्ती नगर जिल्ह्यातील लोकांची आहे. 

भय्यूजी महाराजांच्या अध्यात्म क्षेत्रातील प्रवेशावेळीच १९९५ च्या सुमारास काशिनाथ दुधाडे हे त्यांचे भक्त झाले. काशिनाथ दुधाडे यांचा मुलगा विनायक याला इंदोरमध्ये नोकरी मिळेल, या अपेक्षेने काशिनाथ दुधाडे यांनी त्यांना इंदोरला बोलावून घेतले. 

विनायक दुधाडे व त्यांचे आतेभाऊ दत्ता शेरकर हे १९९९ च्या सुमारास इंदोरला आल्यानंतर भय्यूजी महाराजांच्या इंदोर येथील आश्रमात जात असे. विनायक दुधाडे यांच्यामधील वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, निष्ठा, प्रेमळ वागणूक , यामुळे काही दिवसांतच ते महाराजांचे पट्टशिष्य बनले. 

तर दत्ता शेरकर यांना महाराजांनी औरंगाबाद येथील आश्रमाची जबाबदारी दिली. त्यानंतर विनायक दुधाडे हे महाराजांचे वयक्तिक व आर्थिक व्यवहार पाहू लागले. कौटुंबिक निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग असायचा. महाराजांच्या अनुपस्थितीत विनायक दुधाडे हेच आश्रमाची ज़बाबदारी सांभाळायचे. 

विनायक दुधाडे हे सध्या ते इंदोरला स्थायिक आहेत. विनायक हे महाराजांचे सर्व व्यवहार व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलायचे. त्यामुळे महाराजांच्या भक्तगणांच्या वर्तुळात विनायक दुधाडे यांचा शब्द प्रमाण होता. मागील दोन वर्षांपूर्वी भैय्यूजी महाराजांनी विनायक दुधाडे यांना आपला मानस पुत्र असल्याचा दर्जा दिला होता. 


Loading...
भय्यूजी महाराज राळेगणसिध्दीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व हिवरेबाजारला पोपटराव पवार यांच्याकडे ते नेहमी येत. महाराज पारनेरला आल्यानंतर ते लोणी हवेलीला विनायक दुधाडे यांच्या घरी किंवा पारनेरला त्यांच्या आत्या नगरसेविका शशिकला शेरकर व आतेभाऊ पत्रकार दता शेरकर व उदय शेरकर यांच्या घरी आवर्जून येत असत. 

पारनेरच्या नगरसेविका विजेता सोबले या विनायक दुधाडे यांच्या भगिनी आहेत. भय्यूजी महाराजांच्या जाण्यानंतर विनायक दुधाडे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. विनायक हे ही जबाबदारी समर्थपणे पेलतील, असा विश्वास त्यांचे आतेभाऊ दत्ता शेरकर व उदय शेरकर यांनी व्यक्त केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.