कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतकरी कारभारी ऊर्फ संजय बाबासाहेब खटाटे (वय ३७) रा. पळशी, ता. पारनेर यांनी कर्ज़बाज़ारी पणाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. 

ही घटना मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. यासबंधीची खबर मयताचा भाऊ विश्वनाथ बाबासाहेब खटाटे (वय ४१) रा. पळशी यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांना दिली. मृतदेहाची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.


मयत कारभारी बाबासाहेब खटाटे यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले , एक मुलगी, असा परिवार आहे. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत खटाटे यांची पळशी येथे जिरायत जमीन आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून नापिकी व राष्ट्रीयकृत बॅंकेसह सेवा संस्था व पतसंस्थांचे ३ ते ४ लाख रुपये कर्ज थकलेले होते.
Loading...
त्यामुळे या थकित कर्जाला कंटाळून कारभारी बाबासाहेब खटाटे यांनी आपल्या घरात लोखंडी पाईपला गळफास घेऊन मंगळवारी रात्री ८.३० वा. राहत्या घरी आपली ज़ीवनयात्रा संपविली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हणुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. साळवे शेळके व सूरज नवले करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.