श्रीगोंद्यात महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवणारा अटकेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेला तिच्या मोबाईलवर फोन करून, तिच्याशी अश्लील बोलून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 

यामुळे आरोपी सहदेव ऊर्फ गोट्या दिलीप इथापे (रा.अनगरे) याचा श्रीगोंदा पोलिसांनी शोध घेऊन त्याला जेरबंद केले.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, दि ८/९/२०१७ रोजी सकाळी संबंधित फिर्यादी महिलेला एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून फोन करून सदर महिलेशी अश्लील बोलून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

सदर महिलेने याबाबत तेव्हा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग,अश्लील संदेश  केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता श्रीगोंदा पोलीस त्या अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत होते.

Loading...
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,अप्पर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील, कर्जतचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे यांनी सदर व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याची माहिती मागवली. परंतु आरोपी व्यक्ती मोबाईल अनेक दिवसांपासून वापरात नसल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अडचण येत होती.

परंतु या आरोपीने अनेक दिवसानंतर त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये सीम टाकून ते चालू केल्यामुळे पोलिसांना त्याबाबत माहिती समजताच, त्या आरोपीच्या मित्राला पोलिसांनी चौकशीकामी बोलावून चौकशी केली असता. त्याने सदर आरोपी सहदेव ऊर्फ गोट्या दिलीप इथापे (रा.अनगर) याने फिर्यादी महिलेला फोन केल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यामुळे पोलिस निरीक्षक पोवार, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे, पो.कॉ किरण बोराडे, उत्तम राऊत यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.