मोदी सरकारने दिला २३ लाख कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १८ हजारांचा फायदा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र सरकारने विद्यापीठ व महाविद्यालयांमधून सेवानिवृत्त झालेल्या २३ लाख कर्मचाऱ्यांना मोठा नजराणा दिला आहे. सरकारने त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनामध्ये सुधारणा केली असून सातव्या वेतन आयोगातील शिफारशींनुसार त्यात बदल केले आहेत.


केंद्रीय विद्यापीठे व महाविद्यालये यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार फायदे मिळणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून या संबंधात माहिती दिली आहे. 

Loading...
विद्यमान २५ हजारांपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारकांना यामुळे फायदा मिळणार असून यांना ६ ते १८ हजार रुपयांपर्यंत फायदा मिळेल, असे जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या सेवानिवृत्ती धारकांशिवाय विद्यापीठांमधून निवृत्त झालेले व ज्यांनी प्रस्तावित वेतनश्रेणी स्वीकारली होती, त्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. यामध्ये सुमारे ८ लाख शिक्षक व १५ लाख शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. 

मात्र, त्यांनी विद्यापीठाच्या प्रस्तावित वेतनश्रेणीला स्वीकारले आहे वा स्वीकारू इच्छित आहेत, त्यांना हा फायदा मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. वास्तविक सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर सरकारने किमान वेतन वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा फायदा केंद्राच्या ४८ लाख कर्मचाऱ्यांना मिळत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.