भानुदास कोतकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातील आरोपी भानुदास कोतकर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दि. २२ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश इनामदार यांच्या समोर सुनावणीच्यावेळी सीआयडी पुणे येथील उपअधिक्षक अरुणकुमार सपकाळे उपस्थित होते. 

Loading...
सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. अर्जुन पवार हे काम पहात आहेत.मनपाच्या पोट निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी (दि. ७ एप्रिल) शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती.

या गुन्ह्यातील अटकेत असलेले व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले भानुदास कोतकर यांच्या वतीने न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे वकिलामार्फत न्यायालयात वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करायचे आहे. त्यासाठी मुदत मिळावी असा अर्ज दाखल केला.

सदरचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून पुढील सुनावणी दि. २२ जून रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीच्यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. अर्जुन पवार व आरोपींच्यावतीने ॲड. महेश तवले हे युक्तीवाद करणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.