पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचाराचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील एका गावात तरुणाने ७ वषांर्च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० वाजच्या सुमारास घडला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेतील आरोपी आकाश बाळू चव्हाण (वय २१), रा. भोकरदारा (ढवळपुरी) याला पारनेर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर बाललैंगिक शोषण कायदा (पास्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
याबाबत पोलिस सूत्रांकडून सजलेली माहिती अशी की, या घटनेतील ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी आकाश चव्हाण याने एका खोलीमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक रहिवासियांनी हा प्रकार पाहिला. त्यावेळी ग्रामस्थांनी आरोपीस जाब विचारला असता, माझी चूक झाली असून, ही बाब कुणाला सांगू नका, असे म्हणत त्याने त्या ठिकाणहून पळ काढला.

याप्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून बाललैंगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हणुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोकॉ. अण्णा चव्हाण करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.