पारनेरचा विनायक होणार भैय्यूजी महाराजांचा वारसदार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्ये नंतर त्यांची दुसरी सुसाईड नोट सापडली आहे,यात त्यांच्या संपत्तीबाबत दुसऱ्या पानावर ''माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले आहे.


Loading...
विनायक अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचा !

विनायक हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहे, विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे, भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असायचा .विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.


मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.


भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.


भय्यू महाराज यांची संपत्ती ?
गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण मिळून १२०० एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त ८० एकर शेती शिल्लक आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा इथली शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी ऐंशी लाख मिळाले.सध्या सुजालपूर मध्यप्रदेश इथे ८० एकर शेती शिल्लक आहे.

महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत अनुदानित इथं दीड हजार विद्यार्थी शिकतात. तसेच पुणे आणि अकोला इथे यांचाही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रम आहे. शाळा आहे.सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथं पाचवी ते बारावी महाविद्यालय आहे साडेतीनशे मुले शिकतात. विनाअनुदानित.

तुळजापूर तालुक्यातल्या मुरता इथं पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी शाळा आहे विनाअनुदानीत साडेतीनशे मुले शिकतात.संस्थेला ८० सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत.अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल होते.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.