शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना धमकी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात जास्त लक्ष घालू नका नाहीतर, तुमचाही बंदोबस्त करू, अशी धमकी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते देण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

केडगाव येथे 7 एप्रिल रोजी संजय कोतकर, वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. या हत्याकांड प्रकरणात तुुम्ही लक्ष घालू नका, नाहीतर बंदोबस्त करु, अशी धमकी सातपुते यांना देण्यात आल्याने केडगाव परिसरात एकच चर्चा रंगली होती. 

Loading...
याबाबत माहिती अशी, केडगाव येथील हॉटेल रंगोली येथे शनिवारी (दि. 9) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सातपुते हे आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी सातपुते यांना सचिन भीमराव सरोदे (रा. केडगाव) यांने बोलवून घेतले. मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही बाहेर असा निरोप दिला. 

केडगाव केसमध्ये तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, नाहीतर तुझाही बंदबोस्त करून असा साहेबांचा निरोप असल्याचे सांगत सरोदे हा पळून गेला. याप्रकरणी सातपुते यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सरोदे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.