श्रीरामपूरात नराधम पित्याकडून मुलीवर अत्याचार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जीवे मारण्याची धमकी देत १३ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. नराधम पित्याने पत्नी व मुलगा घरी नसल्याची संधी साधत हे कृत्य केले. याप्रकरणी पिडीत मुलीने आईला आपबिती कथन केल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी  शहरापासून जवळच असलेल्या एका वस्तीवर २५ मे रोजी रात्री हा प्रकार घडला. पिडीत मुलीची आई आणि भाऊ नातेवाईकांकडे नाशिक येथे गेले होते. पिडीत मुलगी व तिचे वडील घरी होते. रात्री वडिलाने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत मागील महिन्यात ते २५ मे पर्यंत वारंवार अत्याचार केला. 

Loading...
२५ रोजी मे रोजी दुपारी एकटीच असताना असेच कृत्य केले. त्यानंतर झालेला प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला. काल (दि. ११) शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरूद्ध गु.र.नं. १९४, भादंवि कलम ३७६ (२), (१), (आय) सह बाललैगिंक अत्याचार अधिनियम कलम ४, ९ (एन), १० प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.