अहमदनगर जिल्हा परिषदेचे आठ कोटींचे नुकसान !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामविकास खात्याने प्रायोगिक तत्त्वावर या आर्थिक वर्षापासून नव्याने सुरू केलेल्या लिबीलिटी रजिस्टर सिस्टीम (एलआरएस) प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या आर्थिक कोंडीत आणखी भर पडणार आहे. 

विकास कामांसह योजनांसाठी उपलब्ध होणारा निधी खर्च होईपर्यंत बॅंकेचे व्याज जिल्हा परिषदांना मिळत होते. परंतु, त्यावर आता शासनाने टाच आणली आहे. एलआरएस या प्रणालीद्वारे विकास कामांसह योजनांचा निधी थेट ठेकेदारांच्या खात्यावर जमा होणार असल्याने जिल्हा परिषदेला हा निधीच उपलब्ध होणार नाही. तो शासनस्तरावरून खर्च केला जाणार आहे.

यंदा केवळ तीर्थक्षेत्र विकास योजनेचा समावेश झाला आहे. परंतु, पुढील आर्थिक वर्षात सर्वच योजनांचा समावेश होणार असल्याने या विकास कामांसाठी उपलब्ध होणारा निधी बॅंकेत ठेव म्हणून ठेवल्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वअंदाजपत्रकात तब्बल सात ते आठ कोटींची वाढ होत होती.पण, आता जिल्हा परिषदेकडे प्रत्यक्ष निधी येणारच नाही. शासनस्तरावरून योजनांची देयके एलआरएस प्रणालीद्वारे थेट वितरित होणार असल्याने जिल्हा परिषदेचे सात ते आठ कोटींचे नुकसान होईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.