नगर मनमाड रस्त्यावर श्रीगोंद्यातील महिलेचा अपघात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर मनमाड रस्त्यावरील गरवारे चौकात रस्ता ओलांडत असतांना एका महिलेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी, सुमन रामभाऊ काकडे ( रा.ढोरजा ,ता.श्रीगोंदा ,जि.अ.नगर) या दि.28 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान राहुरी येथुन एमआयडीसी येथील गरवारे चौकातील पेट्रोल पंपा समोर उतरून रस्ता ओलांडत असतांना चेतना कॉलनी कडे जात असतांना नगर कडून राहुरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी ने त्यांना जोराची धडक दिली.

या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी विखे हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान दिलेल्या जबाबा वरून एम.एच.17 ए.एस.3932 या दुचाकीवरील चालक किरण गोरक्षनाथ मोरे (रा.वांबोरी ,ता.राहुरी,जि.अ.नगर ) याच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल लाळगे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.