शिवप्रहारच्या जिल्हाध्यक्षांवर राजकीय द्वेषापोटी हद्दपारीचा प्रस्ताव !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवप्रहार संघटेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावरील प्रस्तावित हद्दपारीच्या कारवाईच्या निषेधार्थ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजासह समविचारी समाज घटक यांच्या वतीने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर १९ जुन रोजी सकाळी १० वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे.

शिर्डी प्रांताधिकारी व शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी ऊर्फ सचिन चौगुले हे शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम ते आंदोलनाच्या माध्यमातुन करत असतात.


Loading...
अनेक वर्षांपासून विद्यार्थी, वंचित घटक, कष्टकरी समाज, शेतकरी, कामगार वर्ग, रुग्ण आदींना मदत मिळवुन देणे, त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी ते लढा उभारत असतात. शेतकरी संपात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवुन लढा दिला आहे. मराठा समाजाच्या मोर्चात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

शिवप्रहार संघटनेच्या माध्यमातून गावा गावात जाऊन संघटनेच्या शाखा स्थापन करुन युवकांची मजबुत फळी निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत. असे असताना केवळ केवळ राजकीय द्वेषापोटी हद्दपारीचा प्रस्ताव त्यांच्या विरोधात तयार केला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यास प्रशासन जबाबदारी राहील, असा इशारा निवेदनात दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.